आमदारांचा स्थानिक विकास निधी आता ४ कोटी

 आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी :  एक कोटींची भरघोस वाढ

 

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शब्द पाळला : राज्यातील आमदारांना दसऱ्याचे गिफ्ट



मुंबई: राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकासनिधीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांच्या विकास निधीत एक कोटी रुपयांची वाढ केली असून आता आमदारांना विकासकामांसाठी चार कोटी इतका निधी मिळणार आहे. ना. अजितदादा पवार यांनी अर्थखात्याची जबाबदारी हातात घेतल्यापासून यावर्षात दोनदा या निधीत वाढ करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून राज्यात कोरोना महामारी, नैसर्गिक आपत्ती आणि लॉकडाऊनमुळे अर्थचक्र रुतले होते. तरीही अजितदादांनी आमदार निधीला कात्री लावली नव्हती. उलट या निधीत दोन वेळा वाढ केली. याचा फायदा सर्वपक्षीय आमदारांना होणार आहे. 


वाढीव निधीच्या माध्यमातून आमदारांना आपल्या मतदारसंघातील विकासकामे पूर्ण क्षमतेने करता यावीत हा या निर्णयामागील हेतू आहे. या निधीचा उपयोग विशेषत: शाळांमधील वर्गांचे बांधकाम, अंगणवाडी केंद्र बांधकाम, व्यायामशाळा, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी, कोल्हापूर पद्धतीचे लहान बंधारे, अशा सार्वजनिक उपक्रमांची डागडुजी तसेच बांधणी करण्यासाठी होणाप आहे.


अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या या नियोजनाचे कौतुक खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेतही केले होते. कोरोनामुळे एकीकडे केंद्र सरकारने खासदार निधीत कपात केली असताना दुसरीकडे राज्य सरकारने मात्र आमदारांना निधी कमी पडू दिलेला नाही. त्यामुळे अजितदादांनी अर्थखात्याचे जशारीतीने नियोजन केले, ते केंद्रानेही शिकावे, अशी सूचनाच सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेत केली होती. आपल्या या अचूक नियोजनाची झलक पुन्हा एकदा या निर्णयाद्वारे अजितदादांनी दाखवून दिली आहे.  


दरम्यान, २०११-१२ या आर्थिक वर्षापासून रु. दोन कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला जात होता. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या निधीत एक कोटींची वाढ करुन तो निधी तीन कोटी इतका केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा या निधीत एक कोटींची वाढ करुन हा निधी चार कोटींपर्यंत वाढविण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post