२०१४ 'या' कॉंग्रेस नेत्याच्या छुप्या मदतीमुळे खासदार झालो... शिवसेना खासदाराचा आदित्य ठाकरेंसमोर मोठा गौप्यस्फोट

 नगर: गेल्या 16 वर्षांपासून संगमनेर तालुक्यात महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळ्यात वृक्षारोपण करत दंडकारण्य अभियान राबविले जाते.आज दंडकारण्य अभियानाचा सांगता सोहळा पार पडला.राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्यमंत्री विश्वजित कदम उपस्थित होते. यावर्षी महाविकास आघाडी स्थापन झाल्याने दंडकारण्य सोहळ्याला शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अनेक गुपिते उघड करत 2014 ला बाळासाहेब थोरात यांनी मला निवडणुकीत छुपी मदत केल्याचा गौप्यस्फोट भाषणातून केला. तर, 2019 ला विखेंच्या मदतीने खासदार झाल्याने आज आई जेवू देईना आणि बाप भीक मागू देईना अशी माझी अवस्था झालीय, असे वक्तव्य केल्यानंतर सभेत एकच हशा पिकला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post