राज ठाकरेंच्या नावावर खंडणी.... सिनेसृष्टीतील ३ जण गजाआड


राज ठाकरेंच्या नावावर खंडणी.... सिनेसृष्टीतील ३ जण गजाआड मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावावर खंडणी मागण्याचा  प्रकार समोर आला आहे. याबाबत एक व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज ठाकरेंचे नाव घेत एका सुरक्षा रक्षकाला दमदाटी करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणी आता तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

तू राज ठाकरेंना ओळखत नाहीस? काम कोणासाठी करतोय? महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये राहतोय ना तू? असे ओरडत, एका सुरक्षा रक्षकाला मारहाण करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावाने खंडणी मागितल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. याच प्रकरणी सध्या मुंबई मधील मालवणी पोलीसांकडून सिनेसृष्टीतील तिघांना बेड्या ठोकण्यात आले आहेत.

यामध्ये दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माता युवराज बोराडे आणि चालक सागर सोलणकर यांना अटक करण्यात आली आहे. तसेच पोलीसांनी याप्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला देखील नोटीस पाठवली आहे. ही अभिनेत्री मनसेची कार्यकर्ता असल्याचे सांगितले जातं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post