मुलांना "पारले जी" बिस्कीट द्या..अन्यथा अघटीत घडू शकते...अफवेमुळे दुकानांसमोर ग्राहकांची झुंबड

एक अफवा...आणि ‘पारले जी’चा दुकानातील स्टॉकच संपला....



 एका प्रसिद्ध बिस्कीट कंपनीचं बिस्कीट खाण्यावरून बिहारमध्ये सध्या अफवेचं लोण पसरलं आहे. हे लोण इतकं वाढलं की किराणा दुकानावरील या कंपनीचा स्टॉक हा हा म्हणता संपला. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारच्या सीतामढी भागात ही अफवा पसरली होती. बिहारमध्ये या काळात जितिया पर्व नावाचा धार्मिक उत्सव सुरू असतो. या काळात ज्या महिलांना मुलगे असतात त्या महिला त्याच्या आयुरारोग्यासाठी व्रतवैकल्यं करतात. हा उत्सव सुरू असतानाच कुणीतरी आवई उठवली की, या काळात घरात जितके मुलगे आहेत त्या सर्वांनी एका प्रसिद्ध बिस्कीट ब्रँडचं बिस्कीट खायला हवं. ते न खाल्ल्यास त्यांच्या जिवाला धोका उत्पन्न होऊ शकतो किंवा काहीतरी बरंवाईट होण्याची शक्यता आहे. या अफवेची भीती इतकी होती की लोक हातातली कामं टाकून किराणा दुकानात धावले. 

ही अफवा कधी व कुठून पसरली हे कुणालाही माहिती नाही. परंतु या अफवेमुळे पार्ले जी बिस्किटच्या विक्रीत वेगाने वाढ झाली आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत लोकं पार्ले जी बिस्किट खरेदी करताना आढळले. जेव्हा लोकांना विचारण्यात आले की, पार्ले जी बिस्किट खरेदी करण्यासाठी इतकी गर्दी का केलीय? तेव्हा कळालं की, पार्ले जी बिस्किट न खाल्ल्याने काहीतरी अघटित घटना घडू शकते. त्यामुळे पार्ले जी बिस्किट खरेदी करून मुलांना खाण्यास दिलं जात आहे.  गेल्या काही दिवसांत पार्ले जी बिस्किटाची मागणी प्रचंड वाढली आहे. प्रत्येकजण पार्ले जी बिस्किट द्या असं म्हणत आहे. त्यामुळे दुकानात पार्ले जी बिस्किटचा स्टॉक संपला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post