पन्नास हजार घरांवर भगवे ध्वज... शिवसेनेचे ‘ध्वज दिवाळी अभियान’

 पन्नास हजार घरांवर भगवे ध्वज... शिवसेनेचे ‘ध्वज दिवाळी अभियान’ औरंगाबादः आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  शिवसेनेचा गड  मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरात शिवसेनेने यंदा अनोख्या पद्धतीने शक्तीप्रदर्शन करण्याचे ठरवलेले दिसत आहे. शिवसेनेने 1 ते 3 नोव्हेंबरदरम्यान ध्वज दिवाळी अभियान हाती घेतले आहे. या काळात पन्नास हजार घरांवर भगवे ध्वज लावले जाणार आहेत, असी माहिती शिवसेनेने काल पत्रकार परिषदेत दिली. 

आमदार संजय शिरसाट आणि आमदार अंबादास दानवे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यात शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वतीने यंदा दिवाळीत ‘ध्वज दिवाळी अभियान’ राबवण्यात येणार असल्याची माहिती दिली. ध्वज दिवाळी हे अभियान 1 ते 14 नोव्हेंबरपर्यंत राबवले जाणार असून 1 ते 3 नोव्हेंबरपर्यंत शहरातील पन्नास हजार घरांवर भगवे ध्वज लावले जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या काळात रेकॉर्डब्रेक घरांवर भगवे ध्वज लाहतील, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद होईल, असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post