बनावट चलनी नोटांचे रॅकेट...महिला डॉक्टरसह पाच जणांना अटक

बनावट चलनी नोटांचे रॅकेट...महिला डॉक्टरसह पाच जणांना अटक नाशिकः नाशिक जिल्ह्यात 500 रुपयांच्या   291 बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या   पाच जणांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.   यात एक महिला आरोपी डॉक्टर आहे.

  बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जिल्ह्यात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.  माहितीनुसार त्यांनी दोन संशयितावर पाळत ठेवली. त्यानंतर लासगावचे मोहन बाबुराव पाटील, डॉ. प्रतिभा बाबुराव घायाळ (रा. बोराडे हॉस्पिटलजवळ, लासलगाव) आणि विठ्ठल नाबरिया (रा. कृषीनगर, कोटमगाव रोड, लासलगाव) यांची कसून चौकशी केली.  या माहितीतूनच त्यांना रवींद्र हिरामण राऊत (रा. स्मारक नगर, पेठ) आणि विनोद पटेल (रा. पंचवटी, नाशिक) हे पाचशे रुपयांच्या बनावट नोटा घेऊन येणार असल्याचे कळले. ते दोघे या नोटा मोहन पाटील व डॉ. प्रतिभा घायाळ यांना देणार होते. पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून सापळा रचला. ठरलेल्या ठिकाणानुसार येवलारोड विंचूर येथे मोहन पाटील, डॉ. प्रतिभा पाटील आणि विठ्ठल नावरिया यांना पाठवले. तेव्हा रवींद्र हिरामण राऊत, विनोदभाई पटेल हे त्यांची चारचाकी गाडी घेऊन आले. यावेळी पोलिसांनी पंचासमक्ष छापा मारला. तेव्हा आरोपींकडे पाचशे रुपयांच्या 291 बनावट नोटा सापडल्या. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात कलम 489 नुसार गुन्हा दाखल करून पाच जणांना बेड्या ठेकून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post