उद्यानाच्या सावित्रीबाई फुले यांच्या नावावरुन वाद...‘साध्वी’ शब्दाला हरकत...

 

पुण्यातील उद्यानाच्या सावित्रीबाई फुले यांच्या नावावरुन वाद...‘साध्वी’ शब्दाला हरकत...पुणे :  पुणे महापालिकेकडून एका उद्यानाला 1991 साली सावित्रीबाई फुलेंचं नाव देण्यात आलं. पण उद्यानाच्या फलकावर सावित्रीबाईंचा उल्लेख साध्वी सावित्रीबाई फुले असा असल्यानं वाद निर्माण झालाय. 30 वर्षांनंतर हा वाद निर्माण झाला आहे. पुणे महापालिकेकडून सावित्रीबाई फुलेंना हिंदुत्त्ववादी विशेषणं लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आता समता दलानं केला आहे. समता दलाच्या कार्यकर्त्यांनी सावित्रीबाईंच्या नावाच्या आधी असलेल्या साध्वी हा उल्लेख झाकून टाकला आहे. पुण्यातल्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाजवळ हे उद्यान आहे.  

1991 ला कॉंग्रेस सरकारमधील तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते या उद्यानाची कोनशीला बसवल्याची पाटी देखील आहे. पुण्यातील ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाजवळ पुणे महानगरपालिकेने या उद्यानाला नाव देताना पाटीवर साध्वी सावित्रीबाई फुले असा उल्लेख केला आहे. यामुळं चांगलाच वाद पेटला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post