दिवाळीत खवा, पनीर आवर्जून घेताय?...मग भेसळ ओळखण्यासाठी घरच्या घरी करा ‘या’ टेस्ट

 

दिवाळीत खवा, पनीर आवर्जून घेताय?...मग भेसळ ओळखण्यासाठी घरच्या घरी करा ‘या’ टेस्टदिवाळीच्या औचित्य साधून मिठाईच्या मागणीत वाढ होते; पण   भेसळयुक्त खवा आणि पनीरचे सेवन केल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या दिवसात प्रत्येक व्यक्तीने दक्ष राहूनच विविध खाद्यपदार्थ्यांची खरेदी केली पाहिजे.

विविध मिठाईची निर्मिती करताना खव्याचा वापर केला जातो. तर काही व्यक्ती पनीरचे विविध खाद्यपदार्थ तयार करतात. पण भेसळयुक्त खव्यासह पनीर मनुष्याच्या आरोग्यासाठी हानिकारकच असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.  

 खवा शुद्ध आहे की नाही हे ओळखण्यासाठी थोडा खवा हातावर घेऊन घासून बघावा. खव्याचा पोत दाणेदार असला, तो हातावर चोळल्यानंतर हात तेलकट झाले आणि हाताला शुद्ध तुपासारखा सुगंध आला म्हणजे खवा शुद्ध आहे हे समजावे.

 शुद्ध खवा ओळखण्याची दुसरी पद्धत अशी आहे की, एक चमचा खवा घ्यावा, तो एक कप गरम पाण्यात मिसळावा. नंतर कपामध्ये आयोडिनचे काही थेंब टाकावेत. आयोडिन टाकल्याने गरम पाण्यात मिसळलेला खवा जर निळा झाला तर त्यात स्टार्चची भेसळ झाली आहे हे समजावे.

 पनीरचा एक तुकडा घेऊन तो चोळून पाहावा. चोळल्यानंतर त्या पनीरचे लगेचच बारीक तुकडे व्हायला लागले. तर समजावे की पनीर भेसळयुक्त आहे.  पनीर पाण्यात उकळून थंड करावे. थंड झाल्यानंतर त्यातल्या एका तुकड्यावर आयोडिन टिंचरचे काही थेंब घालावेत. त्यानंतर पनीरचा रंग निळा झाला, तर ते पनीर बनावटी असल्याचे समजावे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post