'या' कारणामुळे नगर जिल्ह्यात करोना नियंत्रणात येत नाही, माजी मंत्री राम शिंदे यांचा मोठा दावा

 'या' कारणामुळे नगर जिल्ह्यात करोना नियंत्रणात येत नाही, माजी मंत्री राम शिंदे यांचा मोठा दावानगर : नगर जिल्हा विभाजन करावे या मागणीचे निवेदन भाजपचे सोशल मीडिया सेल उत्तर नगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. या निवेदनाची दखलही मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. या संदर्भात आता भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनीही प्रतिक्रिया देत जिल्हा विभाजनाची गरज व्यक्त केली आहे. 

प्रा.राम शिंदे म्हणाले,  मी अहमदनगर जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव राज्य शासनासमोर मांडला होता. मात्र तो होऊ शकला नाही. क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून अहमदनगर हा राज्यातील सर्वांत मोठा जिल्हा आहे. त्यामुळे प्रशासनाला नियंत्रण ठेवायलाही अडचणीचे होते. ते कोविड-19 महामारीतही अनेक वेळा सिद्ध झाले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात येत असताना अहमदनगर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत नाही. याला कारण जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे आहे. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे. 'सरकारनामा'ने सदर वृत्त दिले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post