तुम्ही 'सूक्ष्म' मंत्री असल्याने नाव सुक्ष्म केलं आहे, शिवसेनेचा नारायण राणेंना टोला.

 

तुम्ही 'सूक्ष्म' मंत्री असल्याने नाव सुक्ष्म केलं आहे, शिवसेनेचा नारायण राणेंना टोलामुंबई : सिंधुदुर्ग  मध्ये उद्या होणाऱ्या चिपी विमानतळाच्या  उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये माझं नावं लहान का ? राजकारणात प्रोटोकॉल असतो, असा सवाल राणेंनी आज त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये  उपस्थित केला होता याच मुद्द्यावरुन पत्रकारांनी पत्रकारांनी सावंत यांना प्रश्न विचारला असता 'राज्य सरकारला प्रोटोकॉल कळतो, तुम्ही सूक्ष्म मंत्री असल्याने नाव सुक्ष्म केलं आहे.' असा टोला शिवसेनेचे उपनेते खासदार अरविंद सावंत  यांनी नारायण राणेंना टोला लगवाला आहे. 

तुम्ही मुख्यमंत्र्यांना बोलवू नका म्हणत होता आम्ही लहान का असेना नावं टाकलं याला मनाचा मोठपणा म्हणतात, शिवाय केवढं का असेना नावं आहे याला महत्व आहे असही सांवत म्हणाले. तसंच विमानतळाचं उद्घाटन आहेना "मग शुभ बोल... रे... पुढचं मी म्हणणार नाही..." अशी टीका सावंत यांनी राणेंवरती केली

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post