नगर जिल्ह्यात गांजा शेती जोमात... पोलिस कारवाईत ९ लाखांचा मुद्देमाल जप्त... व्हिडिओ

 

नगर जिल्ह्यात गांजा शेती जोमात... पोलिस कारवाईत ९ लाखांचा मुद्देमाल जप्त, व्हिडिओ



नगर (विक्रम बनकर): श्रीगोंदा  तालुक्यात पोलिसांनी छापा टाकून एका शेतामध्ये सुमारे ८ लाख ९५ हजार रुपयाचा गांजा जप्त केला आहे. कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व श्रीगोंदा पोलिसांनी संयुक्त कारवाई मध्ये हा गांजा जप्त करून दोन इसमांना ताब्यात घेतले आहे. 

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. ३० रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना माहिती मिळाली की, श्रीगोंदा शिवारातील जगताप वस्ती दत्तवाडी लोखंडेवाडीचे मध्ये शेत जमीन गट नंबर ७००, ७०१ यामध्ये लिंबोणीच्या झाडांचे मध्ये गांजाची लागवड केली आहे. सदर माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व पोलीस पथक हे श्रीगोंदा शिवारातील दत्तवाडी लोखंडेवाडी येथील जगताप वस्ती या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता या ठिकाणी लिंबोंणीच्या शेतामध्ये गांजाची लहान-मोठी झाडांची लागवड केलेली होती. सदर ठिकाणी छापा टाकून तेथे हजर असणारे दोन इसम यात अरुण हरिभाऊ जगताप  व बाळू हरिभाऊ जगताप ( दोघे राहणार जगताप वस्ती दत्तवाडी, लोखंडेवाडी, श्रीगोंदा शिवार ) अशा दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले.

 यावेळेस पोलीस पथका समवेत कृषी अधिकारी यांचे उपस्थितीत व्हिडीओ चित्रण करण्यात आले होते. सदर छाप्यात गांजाची लहान-मोठी हिरवेगार पाला असणारी झाडे ताब्यात घेण्यात आली यामध्ये एकूण ८ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस अंमलदार केशव व्हरकटे, सागर जंगम, दादासाहेब टाके,अंकुश ढवळे, गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, अमोल कोतकर, गणेश गाडे आदींनी केली आहे.

व्हिडिओ




0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post