माळीवाडा बसस्थानकात एस.टी.च्या धडकेत वृध्द जागीच ठार

माळीवाडा बसस्थानकात एस.टी.च्या धडकेत वृध्द जागीच ठारनगर (विक्रम बनकर): अहमदनगरच्या माळीवाडा बसस्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात एका वृध्दाचा मृत्यु झाला. बसस्थानकावर उभ्या असलेल्या वृध्दाला अहमनगर-नाशिक (क्रमांक  एमएच 06 एस 8464) या बसची धडक बसून ते चाकाखाली सापडले. यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. नामदेव चतरू जाधव (वय 76, मु.पो.ठाकर, शनीचे राक्षसभवन, ता.गेवराई, जि.बीड) असे मयताचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post