भाजप महिला अनुसूचित जाती मोर्चाची कार्यकारणी जाहीर

 भाजप महिला अनुसूचित जाती मोर्चाची कार्यकारणी जाहीर


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्वकांशी योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू:   महेंद्र   गंधे


 नगर  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबविल्या असून त्या शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे. भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष पदाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. नगर शहरामध्ये महिलांचे संघटन केले जाईल. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती महिला मोर्चाची शहर जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यांनी भाजपाच्या मिळालेल्या पदाच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांचे प्रश्न सोडवावे. असे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैया गंधे यांनी केले.
        भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हा अनुसूचित जाती महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र  गंधे, अनुसूचित जाती जमातीचे प्रदेशउपाध्यक्ष वाल्मीक निकाळजे, अनुसूचित जाती जमातीचे शहर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटोळे, महिला शहर जिल्हाध्यक्ष कुसुमताई शेलार, ॲड अभिजीत आढागळे, संतोष पाटोळे, दीपक उमाप, साहेबराव काते, सोनू साबळे, अशोक भोसले, अजय देवकुळे, सुनील सकट, आदी उपस्थित होते.
        कुसुमताई शेलार म्हणाले की अनुसूचित जाती महिलांचे संघटन करून प्रश्न सोडवायचे काम केले जाईल. केंद्र सरकारच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम करू. भाजपा अनुसूचित जाती जमाती ची कार्यकारणी जाहीर केली आहे. यापुढील काळात महिलांच्या माध्यमातून पक्षसंघटना वाढविणार असल्याचे ते म्हणाले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post