शरद पवार म्हणाले 'त्या' एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत.... आता पंकजा मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया

 



मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत.  त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पंकजा मुंडे या लहान नेत्या आहेत. त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही असं म्हटलं होतं. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता, पंकजा मुंडे यांनी ते जर तसं म्हणाले असतील तर त्याने मी लहान होत नाही आणि मोठीही होत नाही. मी आहे तशी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. 

मी पवार साहेबांचं वक्तव्य मोबाईलवर पाहिलं. त्यांचं बरोबर आहे, मी एवढी मोठी नेता नाही. मी लहानच नेता आहे. पण मोठ्या नेत्यांनी लहान नेत्यांविषयी बोललं पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांना शिकवलं पाहिजे, असं मी शिकली आहे. ते जर तसं म्हणाले असतील तर त्याने मी लहान होत नाही आणि मोठीही होत नाही. मी आहे तशीच आहे. बाकी ते आमच्यापेक्षा मोठेच आहेत, त्यात काही वादच नाही’, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post