भिंगारमधील आगीत व्यावसायिकांचे मोठं नुकसान...आ.संग्राम जगताप यांनी केले मदतीबाबत आश्वस्त

 

भिंगारमधील आगीत व्यावसायिकांचे मोठं नुकसान...आ.संग्राम जगताप यांनी केले आश्वस्त




नगर: (शुक्रवारी)रात्री पहाटेच्या सुमारास भिंगार छावणी परिसरात सदर बाजार लगत असलेल्या नेहरू मार्केटला भीषण आग लागली. या आगीत नेहरू मार्केट मधील छोटे-मोठे व्यवसायिकांचे दुकाने भस्मसात झाली आहेत. त्यामुळे व्यवसायिक आर्थिक संकटात सापडला आहेत. लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाला पंचनामा करण्याचे आदेश आ.संग्राम जगताप यांनी दिले असून लवकरात लवकर व्यवसायिकांना आर्थिक मदत मिळवून देऊ. व्यवसायिकांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

भिंगार नेहरू मार्केट मध्ये पहाटे लागलेल्या भीषण आगीत बेकरी, टेलरिंग, किराणा, कॉस्मेटिक, कपड्याचे दुकाने, आदीसह आगीत दुकाने पूर्णपणे जळाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच आग विझविण्यासाठी तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्या अहमदनगर महानगरपालिका, एमआयडीसी, राहुरी, व्हीआरडी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवील्या. 

या संकटात सापडलेल्या व्यवसायिकांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत.



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post