राज्यात आणखी अनलॉक, सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

 मुंबई, दि. 12 : कोविड पार्श्वभूमीवर राज्यातील बंदिस्त सभागृहे आणि मोकळ्या जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यास येत्या 22 ऑक्टोबरपासून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. राज्य शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात येत असून याबाबतचा शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2021 रोजी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे.

बंदिस्त सभागृहे तसेच मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना कोविड संदर्भातील केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या कोणत्याही निर्बंधाचा भंग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टद्वारे प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देणे ही सभागृह व्यवस्थापनाची / आयोजकांची जबाबदारी असणार आहे. बंदिस्त सभागृहाच्या एकूण बैठक क्षमतेच्या 50 टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असू नये याची काळजी घेण्यात यावी. बंदिस्त सभागृहातील व्यासपीठ व प्रेक्षकांमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे (किमान 6 फुट) आवश्यक असेल. याशिवाय बैठक व्यवस्थेत सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहील.


कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील नाट्यगृहे तसेच चित्रपट गृहे मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात येत्या 22 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post