स्फोटक वक्तव्य...चंद्रकांत पाटील म्हणाले... कॉंग्रेस नेते दरोडेखोर नसतात पण राष्ट्रवादीचे.....

 

चंद्रकांत पाटील म्हणाले... कॉंग्रेस नेते दरोडेखोर नसतात पण राष्ट्रवादीचे.....सोलापूर: काँग्रेस नेते वेल कल्चर आहेत. ते दरोडेखोर नसतात. पण राष्ट्रवादीवर भरवसा नाही, असा जोरदार हल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भरवशाचा नाही. त्यांचं सकाळी एक राजकारण असतं आणि रात्री दुसरंच राजकारण असतं. एक वेळ काँग्रेस परवडली. काँग्रेस नेते वेल कल्चर आहेत. ते दरोडेखोर नसतात. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीच्या सलगीला भूलणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

यावेळी त्यांनी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आज पदोपदी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते. ते म्हणायेच खोटे बोलू नका. मात्र, हे सरकार प्रत्येक ठिकाणी खोटे बोलत आहे. त्यामुळे क्रांती रेडकर असेल किंवा मी आम्हाला बाळासाहेबांची आठवण येणे साहजिकच आहे, असं ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post