धक्कादायक... आणखी एका एस.टी.कर्मचार्याचा आत्महत्येचा प्रयत्न

 धक्कादायक... आणखी एका एस.टी.कर्मचार्याचा आत्महत्येचा प्रयत्ननागपूरः नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील एसटी आगारात चालकानं आत्महत्या केल्याची घटना घडली असतानाच नागपूर येथेही एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

नागपूर येथील गणेश पेठ बसस्थानकावर चालकाने विजेच्या खांबावर चढून तेथून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कमलेश ठाकरे असं या चालकाचे नाव आहे.

ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर इतर सहकाऱ्यांनी त्याला समजावून खाली उतरवले. त्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे. या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सकाळी ९च्या सुमारास ही घटना घडली आहे. मागण्या मान्य झाल्या असल्या तरी एसटी कर्मचारी आर्थिक संकटात असल्याने ठाकरे यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे समजते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post