नगरचे पालकमंत्रीपद जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना मिळावे, शिवसेना पदाधिकारी आग्रही

 

नगरचे पालकमंत्रीपद जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना मिळावे, शिवसेना पदाधिकारी आग्रहीनगर: राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी नको असे पक्षाला कळवल्याने नवीन पालकमंत्री कोण याविषयी चर्चा रंगली आहे.‌ नगरचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी कडे असले तरी आता शिवसेनेने या पदासाठी आग्रह धरला आहे. शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत नगरचे पालकमंत्रीपद जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना देण्याची मागणी केली आहे. मुंबई येथे शिवसेना नेते विश्वनाथ नेरुरकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ही मागणी करण्यात आली. यावेळी पक्षाचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, संदेश कार्ले, राजेंद्र दळवी, नगर शहरप्रमुख दिलीप सातपुते, आनंद लहामगे, बंडू रोहोकले आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post