मद्यपीने घरात घुसून केली सोन्याच्या दागीन्यांची चोरी

 मद्यपीने घरात घुसून केली सोन्याच्या दागीन्यांची चोरीनगर- दारू पिऊन आलेल्या आरोपीने घरात बळजबरीने घुसून घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागीने चोरुन नेल्याची घटना नगर तालुक्यातील कापूरवाडी येथील आगडगाव रोडवरील भिंगारदिवे मळा परिसरात गुरुवारी (दि.14) मध्यरात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत नंदा बाळासाहेब भिंगारदिवे (रा.भिंगारदिवे मळा, कापूरवाडी) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नंदा भिंगारदिवे या घरात झोपलेल्या असताना आरोपी किरण झुंबर कराळे (रा.मळगंगा मंदिराशेजारी, कापूरवाडी) हा दारू पिऊन आला व त्याने घरात घुसून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागीने बळजबरीने चोरुन नेले. या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी किरण कराळे याच्या विरुद्ध भा.दं.वि.क. 457, 380 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post