राज्यातील बड्या मंत्र्याचे 'फेसबुक' पेज हॅक....सायबर सेलकडे तक्रार

 

राज्यातील बड्या मंत्र्याचे फेसबुक पेज हॅक....सायबर सेलकडे तक्रार



मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. तशी माहिती खुद्द मुंडे यांनीच दिली आहे. इतकंच नाही तर याबाबत फेसबुकला कळवण्यात आलं आहे. तसंच सायबर सेलकडेही तक्रार केल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 

धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. मी धनंजय मुंडे या अधिकृत अकाऊंटवरुन अॅडमीन आणि मॉडेरेटर म्हणून कुठलिही अॅक्टिव्हिटी करु शकत नाही. त्यामुळे फेसबुकने लक्ष देऊन लवकरात लवकर मला माझे अॅडमीनचे अधिकार देत पेज सुरु करावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी फेसबुककडे केलीय. तसंच याबाबत महाराष्ट्र सायबर सेलकडे आपण रितसर तक्रार दिल्याची माहितीही मुंडे यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post