अवैध धंद्यावर छापे, अवैध गावठी दारु व साधने जप्त...४ आरोपी जेरबंद

 पारनेर तालूक्यातील अवैध धंद्यावर छापे टाकून १ लाख ३२ हजार रुपये किंमतीची अवैध गावठी दारु व साधने जप्त करुन ४ आरोपी जेरबंद


स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईअहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक नेमून जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अधीकारी व कर्मचारी यांनी पारनेर तालुक्यात दिनांक ७/१०/२०२९ रोजी विशेष मोहिम राबवून ४ ठिकाणी छापे टाकून एकूण १ लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन, गावठी हातभट्टीची दारु व मोटार सायकल जप्त करुन एकूण चार आरोपीं विरुध्द पारनेर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र राज्य दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.


सदरची कारवाई अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व नगर ग्रामिणचे उपविभागीय पोलीस अधीकारी, अजित पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ भाऊसाहेब काळे, दत्तात्रय हिंगडे, पोकॉ राहूल सोळंके, रोहिदास नवगिरे, आकाश काळे, चालक संभाजी कोतकर यांनी केलेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post