परतीचा पाऊस, पुढील ८ दिवस मुसळधार कोसळणार...नगर जिल्ह्यात आजही अलर्ट


परतीचा पाऊस, पुढील ८  दिवस मुसळधार कोसळणार...नगर जिल्ह्यात आजही अलर्ट पुणे: मान्सुनचा परतीचा काळ सुरू झाला आहे. त्यामुळे   पुढील आठ दिवस राज्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने राज्यभर हजेरी लावली होती. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पिकांची मोठी हानी झाली. आता आठवडाभर राज्यात ही स्थिती कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास आणि बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा अधिक सक्रिय झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील आठवड्यात सोमवारनंतर पाऊस काहीशी विश्रांती घेण्याची शक्यता असून,

१४ ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुन्हा एकदा पाऊस अधिक सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

आज (रविवारी) देखील नगर जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने नगर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सर्तकतेचे आदेश काढले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post