मध्यरात्री १ लाख ९० हजारांची लाच, उपायुक्त 'एसीबी'च्या जाळ्यात

 

जात पडताळणीसाठी मध्यरात्री १ लाख ९० हजारांची लाच, उपायुक्त 'एसीबी'च्या जाळ्यात



पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मध्यरात्री कारवाई करत जात पडताळणी उपायुक्तांना १ लाख ९० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. नितीन ढगे असे अटक केलेल्या उपायुक्तांचे नाव आहे. ढगे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात उपायुक्त आहेत. तसेच ते जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य देखील आहेत. जात प्रमाणपत्र पडताळणी करुन ते वैध करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करुन प्रत्यक्षात १ लाख ९० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी

यातील तक्रारदार यांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्यासाठी त्यांनी जिल्हा जात पडताळणी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी लोकसेवक नितीन ढगे यांनी त्यांच्याकडे ८ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.  तक्रारदारांनी ढगे यांनी पैसे देण्यासाठी वानवडीतील आपल्या निवासस्थानाजवळ बोलावले होते.


त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराकडून १ लाख ९० हजार रुपयांची लाच घेताना ढगे यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post