आ.निलेश लंकेंची राष्ट्रवादीत ‘क्रेझ’ वाढली...रायगड जिल्ह्यात युवा संवाद मेळाव्यात केले मार्गदर्शन

आ.निलेश लंकेंची राष्ट्रवादीत ‘क्रेझ’ वाढली...रायगड जिल्ह्यात युवा संवाद मेळाव्यात केले मार्गदर्शन
 नगर: करोना काळात केलेल्या उत्कृष्ट कामामुळे पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे  राष्ट्रवादीत वजन वाढले आहे. राज्यभरात आ.लंके यांना विशेष आमंत्रण देऊन सन्मान केला जातो आहे. आर आर पाटील यांच्यानंतरचा राष्ट्रवादीचा ग्रामीण चेहरा म्हणून लंके समोर येत आहे. आ.लंके यांनी नुकतीच   रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने रोहा येथे जिल्हा युवक मेळावा हजेरी लावली. या मेळाव्यास खा.सुनिल तटकरे, पालकमंत्री आदितीताई तटकरे,मावळचे आ. सुनिल अण्णा शेळके, आ.अनिकेत तटकरे उपस्थित होते.

युवक ही आपल्या पक्षाची ताकद आहे. युवक संघटनेने सर्वसामान्य लोकांची कामं करावी तसेच, सरकारच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम करावे. जिल्ह्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवकांनी आपली ताकद दाखवून द्यावी. पक्षात्मक संघटन वाढीसाठी स्वतःला झोकून देत प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करावे. जिल्ह्याच्या विकासामध्ये युवकांचा वाटा मोलाचा असावा, असा आशावाद  आ.लंके यांनी व्यक्त केला. 


यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष . मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, रोहा तालुकाध्यक्ष श्री. विनोदभाऊ पासलकर, नगराध्यक्ष श्री. संतोष पोटफोडे, जिल्हा निरीक्षक श्री. अजय बिरवटकर, युवक जिल्हाध्यक्ष श्री. अंकित साखरे, रोहा युवक तालुकाध्यक्ष श्री. जयवंत मुंडे, पं. स. उपसभापती, सदस्य, नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post