तळ्यात आढळला अल्पवयीन मुलीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह... नगर जिल्ह्यातील घटना

तळ्यात आढळला अल्पवयीन मुलीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह... नगर जिल्ह्यातील घटना श्रीरामपूर : तालुक्यातील निमगाव खैरी गावातून बेपत्ता असलेल्या  एका अल्पवयीन मुलीचा कुजलेला मृतदेह येथील तलावात आढळून आला आहे.  शुक्रवारी दुपारी 11 वाजेच्या दरम्यान एक मृतदेह आढळून आला.  मृतदेह कुजलेला असल्याने दुर्गंधी सुटलेली होती. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर हा मृतदेह स्त्री जातीचे असल्याचे निष्पन्न झाले.

सदरची मुलगी ही गावातीलच असल्याची ओळख पटली. ती 3 ऑक्टोबरपासून बेपत्ता झाली होती, असे सांगण्यात आले. तसेच तिच्या कानातील रिंगमुळे तिच्या वडिलांनी तिला ओखळले. या तळ्याजवळ एका पुरुषाचा गॉगल आढळून आला आहे. तसेच तिचे सौंदर्य प्रसाधनाचे साहित्य जळालेल्या अवस्थेत आढळून आले आहे. त्यामुळे तिच्या वडिलांनी माझ्या मुलीचा घातपात झाला असून तिला मारुन टाकण्यात आले असल्याचे सांगितले. सदरचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे पाठविण्यात आला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post