आयकरचा छापा.... कपाटात आढळले १४२ कोटी रुपये

 

आयकरचा छापा.... कपाटात आढळले १४२ कोटी रुपयेहैदराबाद: आयकर विभागाने हैदराबादमध्ये टाकलेल्या धाडीनंतर, सोशल मीडियावर कपाटात खचाखच भरलेल्या नोटांचा फोटो व्हायरल झाला. नुकतंच आयकर विभागाने हेटेरो फार्मास्युटिकल  ग्रुपवर छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले. कारण, हेटेरो फार्मास्टुटिकलच्या कार्यालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना एका कपाटात तब्बल 142 कोटी रुपये सापडले आहेत. 

आयकर विभागाने हैदराबादेतील हेटेरो फार्मास्युटिकल  या कंपनीवर धाड टाकली. आयकर विभाग 550 कोटी रुपयांच्या बेहिशेबी संपत्तीची चौकशी करत आहे. याच चौकशीदरम्यान आयकर विभागाला तब्बल 142 कोटी रुपयांची रोकड सापडली. कपाटात नोटांचा खच किंवा खचाखच भरलेल्या नोटा असा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post