१ कोटी ९३ लाखांचा गैरव्यवहार...'या' पतसंस्थेच्या संचालकांच्या मालमत्ता जप्त

 १ कोटी ९३ लाखांचा गैरव्यवहार... व्यंकटेश पतसंस्थेच्या संचालकांच्या मालमत्ता जप्तनगर : नेवासा तालुक्यातील सोनई येथील व्यंकटेश ग्रामीण पतसंस्थेतील एक कोटी ९३ लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणी पाच संचालकांची शेती व प्लाॅट जप्तीचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिला आहे.

व्यंकटेश पतसंस्थेच्या गैरव्यवहार बाबत सुविधा सुविजय सोमाणी रा.बेलापूर (ता.श्रीरामपूर) यांनी सोनई पोलिस ठाण्यात सन २०१८ मध्ये फिर्याद दिल्यानंतर व्यवस्थापक शामसुंदर शंकर खामकर, कर्मचारी गणेश हरीभाऊ गोरे व गणेश अंबादास तांदळे यांना अटक करून सर्व संचालकावर गुन्हा दाखल झाला होता. ठेवीदाराच्या अंदोलनानंतर ४ जून २०२१ रोजी संचालक गोपाल कडेल व तेजकुमार गुंदेचा यांना अटक करण्यात आली. 

मुदत संपूनही ठेवीदाराच्या ठेवी देत नसल्याने ठावीदाराचे रक्षण म्हणून शासनाच्या वतीने जप्तीचा आदेश काढण्यात आला आहे. आदेशात संचालक अभय शांतीलाल चंगेडिया (शेतजमीन), आनंद अशोकलाल भळगट (प्लॉट,व शेतजमीन), तेजकुमार हिरालाल गुंदेचा (प्लॉट), गोपाल रुपचंद कडेल (प्लॉट) व लक्ष्मण हरिभाऊ राशीनकर ( शेतजमीन) यांची मालमत्ता जप्त केल्याचे आदेश देण्यात आले आहेत.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post