सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्घाटनावेळी नारायण राणेंची फटकेबाजी...मुख्यमंत्र्याकडे शिवसेना लोकप्रतिनिधींबाबत तक्रार

सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्घाटनावेळी नारायण राणेंची फटकेबाजी...मुख्यमंत्र्याकडे शिवसेना लोकप्रतिनिधींबाबत तक्रार सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री आणि नेते तसेच भाजप नेतेही उपस्थित होते. यावेळी नारायण राणे म्हणाले की, आज आनंदाचा क्षण आहे. अशा क्षणी कुठलंही राजकारण नको. आपण जावं, शुभेच्छा द्याव्या या हेतूने मी इथं आलो आहे. विमानं पाहिलं आणि खूप बरं वाटलं. देश विदेशातून पर्यटक सिंधुदुर्गात यावे आणि व्यवसाय वाढून आर्थिक समृद्धी व्हावी असं वाटतं, असं ते म्हणाले. 

 नारायण राणे यांनी स्टेजवरच मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंकडे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची तक्रार केली. उद्धवजी, तुम्हाला चुकीची माहिती ब्रीफिंग केली जात आहे. त्यात सत्य नाही. तुमचे लोकप्रतिनिधी काय करतात याची मााहिती तुम्ही गुप्तपणे घ्या, असं नारायण राणे म्हणाले. 

 उद्धवजी, तुम्हाला सर्व माहिती मिळते. तुम्हाला ब्रीफ होतं. पण ती माहिती चुकीची आहे. तुम्ही माहिती घ्या. गुप्तपणे माहिती घ्या. तुमचे लोक काय करतात याची माहिती घ्या. तुम्हाला सत्य कळेल, असं सांगतानाच बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांनी थारा दिला नव्हता. वाईट बुद्धीने बोलायचं. यायचं हे चांगलं नाही. चांगल्या मनाने या. आम्ही तुमचं स्वागत करू, असं राणे म्हणाले.

 स्टेजवर आल्यावर कळलंच नाही कार्यक्रम कुणाचा? मला आजच कळलं विमानतळाचा मालक कोण? वीरेंद्र म्हस्कर गेले आणि दुसरे आले. स्टेजवर आलो आणि विनायक राऊतांनी सांगितल, म्हटलं कार्यक्रम कुणाचा, एमआयडीसीचा आहे, म्हस्कर साहेबांचा आहे, काय चाललंय? काय प्रोटोकॉल आहे की नाही? काय प्रोटोकल काय? मानसन्मान घ्या. पण प्रोटोकॉल जरुर पाळा. जनता तुम्हाला सन्मान देईलच, असं त्यांनी सांगितलं.

 आदित्य ठाकरे हे माझ्यासाठी टॅक्स फ्री आहेत. तर विनायक राऊतांनी पेढ्याचा गुणधर्म आत्मसात करावा असंही राणे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post