शरद पवार म्हणाले, अजित पवारांकडे 'सरकारी' पाहुणे आले होते...

शरद पवार म्हणाले, अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते... 



सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपवार यांनी सोलापुरात चांगलीच टोलेबाजी केली. शरद पवार म्हणाले, “अजित पवारांकडे सरकारी पाहुणे (आयकर छापा) आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. जनता यांना धडा शिकवेल, असं शरद पवार म्हणाले.


निवडणुकीच्या आधी मला ईडीची नोटीस दिली. मी बँकचा सभासदही नव्हतो. मला भाजपने ईडीची नोटीस दिली, मात्र लोकांनी भाजपला येडी ठरवली. आता  अजित पवारांकडे पाहुणे पाठवले, असं म्हणत शरद पवारांनी आयकर विभागाच्या धाडसत्रावर भाष्य केलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post