भिंगार मधील बिंगो जुगार अड्‌ड्यावर पोलिसांचा छापा

 भिंगार मधील बिंगो जुगार अड्‌ड्यावर पोलिसांचा छापानगर- भिंगार शहरातील गवळीवाडा परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बिंगो जुगार अड्‌ड्यावर भिंगार कॅम्प पोलिसांनी छापा टाकून हा जुगार अड्डा चालविणार्‍यास अटक केली आहे. 

गवळीवाडा येथील अतुल शंकर गुलदगड (वय 34) हा पाण्याचा टाकीजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बिंगो नावाचा जुगारअड्डा चालवत असल्याची माहिती भिंगार कॅम्पचे साहाय्यक पोलिस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्या ठिकाणी जावून छापा टाकला असता आरोपी अतुल गुलदगड हा लोकांकडून पैसे घेऊन बिंगो नावाचा हारजितीचा जुगार खेळवत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून काळ्या रंगाचा 32 इंची एलईडी टिव्ही व काही रोख रक्कम जप्त केली. याप्रकरणी पो.ना.भानुदास खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी अतुल गुलदगड याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post