भिडे गुरुजी म्हणतात..निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे

 भिडे गुरुजी म्हणतात..निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहेसांगली: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आज शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौदचा समारोप होता, यानिमित्त बोलताना ते म्हणाले की, 'भारत म्हणजे गुलामी, दास्याच्या नरकात राहणाऱ्या बेशरम लोकांचा, देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे,' असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं.

सांगलीत बोलत असताना संभाजी भिडे म्हणाले की, 'जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश, मग आपल्या देशाचा क्रमांक एक नंबर कधी येणार. तो क्रमांक एक आपण मिळवला आहे, कुठल्या गोष्टीत? तो म्हणजे निर्लज्जपणात. जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. पण, पारतंत्र्य, गुलामीत राहण्याचा बेशरमपणा असलेल्या बेशरम लोकांचा आपला देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे,' असं संभाजी भिडे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post