नगर तालुक्यातील 'या' दोन गावात सोसायटीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी

 नगर तालुक्यातील 'या' दोन गावात सोसायटीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी

शेतकऱ्यांना बाजार समितीत बदल हवा-प्रा. गाडे मदडगाव, बाळेवाडी महाविकास अघाडीकडे
नगर तालुका, - नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत तालुक्यातील शेतकऱ्यांना बदल हवाय. बाजार समितीत काय चालले आहे. हे तालुक्यातील सर्व जनतेला ज्ञात आहे. म्हणूनच तालुक्यातील सुज्ञ जनता महाविकास अघाडीच्या कार्यकर्त्यांना साथ देत आहेत. त्याची नांदी आज तालुक्यातील सेवा सोसायटीच्या निवडणूकीत मदडगाव व बाळेवाडी येथील निवडणूकीत महाविकास अगाडीच्या मतदारांना निवडून देत बाजार समितीतील सत्ता बदलाची सुरवात केली आहे. असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी मदडगाव येतील सोसायटी विजयी उमेदवारांच्या सत्कार संमारंभात केले. या कार्यक्रमासाठी उपजिल्हा प्रमुख व दरेवाडी जिल्हा परिषद गटाचे सदस्य संदेश कार्ले, प्रविण कोकाटे, तालुका प्रमुख, राजेंद्र भगत, उपतालुका प्रमुख शंकर ढगे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, पॅनल प्रमुख साहेबराव शेडाळे, अजिनाथ गायवळ, प्रमेद काळे, शरद शेडाळे हे उपस्थीत होते. यावेळी विजयी उमेदवार मुरलीधर गायवळ, विलास शेडाळे, मुक्ताराम ढवळे, नितीन सुंबे, राजू शेडाळे, बबन शेडाळे, द्वारकाबाई शेडाळे यांचा प्रा. गाडे, कार्ले, म्हस्के यांच्या हस्ते फेटा बांधून सत्कार करण्यात आला. हा पॅनल विजयी करण्यासाठी मदडगाव येथील युवाशक्तीचे मोहन पालवे, हरीदास काळे, धर्माजी शेडाळे, रत्यवान आठरे, बबन शेडाळे, अक्षय सुंबे, बबन पगडे ,श्रीधर सेडाळे, असोक सुंबे, शहाजी शेडाळे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post