नगर बाजार समितीचा निवडणूकीचा बिगूल वाजला

 नगर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू ; मतदार याद्या सादर करण्याचे आदेशनगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून निवडणुकीसाठी पात्र असलेल्या मतदारांच्या प्राथमिक याद्या तयार करुन त्या दि.१२ नोव्हेंबर पर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी काढले आहेत.

नगर जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या संचालक मंडळांची मुदत मागील वर्षी संपली होती. मात्र कोरोनामुळे निवडणुक प्रक्रियेला राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने स्थगिती दिली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यशासनाने राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणला मुदत संपलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया दि.२३ ऑक्टोबर पासून सुरू करण्याचे आदेश दि. ३० सप्टेबर रोजी दिले होते. त्यानुसार प्राधिकरणने दि. ६ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील नगर व पारनेर वगळता इतर १२ बाजार समित्यांच्या मतदार याद्या तयार करण्याचे आदेश दिले होते.

नगर बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत डिसेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी नगर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पात्र असलेल्या मतदारांच्या प्राथमिक याद्या तयार करुन त्या दि.१२ नोव्हेंबर पर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या संदर्भात नगर तालुका उपनिबंधकांना सोसायटी मतदारसंघातील पात्र मतदारांची यादी तसेच ग्रामपंचायत मतदारसंघातील पात्र मतदारांची यादी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत मतदारसंघातील सादर करण्याबाबतचे पत्र देण्यात आले आहे. याशिवाय व्यापारी व हमाल-मापाडी मतदारसंघातील पात्र मतदारांची यादी तयार करण्याचे आदेश बाजार समिती प्रशासनाला देण्यात आले आहेत.

दि.१२ नोव्हेंबर पर्यंत प्राप्त झालेल्या मतदार याद्यांना मंजुरी देवून प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यानंतर त्यावर हरकती मागवणे, प्राप्त झालेल्या हरकतींवर सुनावणी घेतल्यानंतर अंतीम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्षात निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. साधारणपणे डिसेंबर अथवा जानेवारी महिन्यात नगर बाजार समितीची निवडणुक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post