नगर शहरात भर बाजारपेठेत महिलेची पर्स चोरली

 नगर शहरातील बाजारपेठेतून महिलेची पर्स चोरलीनगर- नगर शहरातील एम.जी. रोड या बाजार पेठेतील दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेची रोख रक्कम व सोन्याचे दागीने असलेली पर्स अज्ञात महिलेने चोरुन नेल्याची घटना गुरुवारी (दि.28) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत चंदा मुकेश सिसोदिया (रा.जाधव मळा, बालिकाश्रम रोड) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चंदा सिसोदिया या गुरुवारी दुपारी खरेदीसाठी बाजारपेठेत आल्या होत्या. तेलीखुटाजवळील कुबेर मार्केटच्या समोर असलेल्या सोनी सेल या दुकानात त्या मुलांना कपडे खरेदी करत असताना त्यांच्या खांद्याला लटकवलेल्या बॅग मधून लाल रंगाची छोटी पर्स दुकानात आलेल्या एका महिलेने त्यांची नजर चुकवून चोरली. या पर्समध्ये सोन्याचे दागीने व रोख रक्कम असा 17 हजार रुपयांचा ऐवज होता. पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुकानातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता अंदाजे 40 ते 45 वयोगटातील, अंगात ग्रे रंगाची साडी परिधान केलेली महिला पर्स चोरताना दिसून आली. 

या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध भा.दं.वि.क. 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post