अन् लग्न कसं जमलं? अजित पवारांनी सांगितला लग्नाचा किस्सा !

 पद्मसिंह पाटलांनी बहीण दिली, घरचे सांगायचे, पोरगं डायरेक्टरयं, अजित पवारांनी सांगितला लग्नाचा किस्साबारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या थेट आणि बिनधास्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध आहेत. आपल्या खास शैलीत ते आपलं म्हणणं मांडत असतात. मीडियाने आपल्या म्हणण्याचा ध चा मा करू नये म्हणूनही ते प्रयत्न करत असतात. आज तर त्यांनी आपल्या आयुष्यातील संस्मरणीय क्षणांची आठवण काढली. त्यांच्या लग्नाचा किस्साच अजितदादांनी सांगितलं. निमित्त होतं दसऱ्याचं.

सोमेश्वर कारखान्यात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या लग्नाचा किस्सा सांगितला. कारखान्याच्या समितीवर निवडून आलेल्यांमध्ये काहीजण कोरी पाटी आहेत. बरेचजण अनुभवीही आहेत. नवीन लोकांना खूप काही शिकता येतं. मला लग्नाआधी छत्रपती कारखान्यात संधी मिळाली… त्यामुळं मला लग्नात सोपं झालं… आमच्या घरचे सांगायचे आमचं पोरगं डायरेक्टर आहे… त्यामुळं पद्मसिंह पाटील यांनी बहीण दिलीय… असं अजितदादांनी सांगताच एकच खसखस पिकली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post