अजित पवार म्हणाले....गुटखा खाणार्‍यांनो, दारु पिणार्‍यांनो माझं ऐका...

गुटखा खाणारे, दारु पिणार्‍यांना अजित पवारांनी दिला व्यसनमुक्त होण्याचा कानमंत्रबारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीकरांना व्यसनमुक्त होण्याचा कानमंत्र दिलं. व्यसनांपासून दूर राहा, गुटखा खाऊ नका, दारू पिऊ नका. नायतर रोज टाकणार आणि म्हणणार बघा, अशा शब्दात अजित पवार यांनी तळीरामांना फटकारले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालयाच्या सीटी स्कॅन विभागाचं लोकार्पण करण्यात आलं. आजार टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारा. सकाळी लवकर उठा. कोणतंही व्यसन करू नका. व्यसनं करशाल तर बरबाद व्हाल, असं अजित पवार म्हणाले.

कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळा. मास्क वापरा. मी फक्त जेवताना आणि पाणी पितानाच मास्क काढतो. काल सगळीकडे गेलो. पण मास्क काढला नाही, असं सांगतानाच तुम्हीही मास्क वापरा. हयगय करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post