लॉजवरील छाप्यात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, ६ तरुणींची सुटका, बडा दलाल अटकेत

 लॉजवरील छाप्यात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, ६ तरुणींची सुटका, बडा दलाल अटकेतपुणे: पुणे-सोलापूर महामार्गालगत एका लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला  आहे. सायबर पोलीस आणि यवत पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हा छापा टाकला आहे. यावेळी पोलिसांनी लॉजवर वेश्याव्यवसाय

चालवणाऱ्या एका दलालाला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच लॉजचा मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा छापा टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसायात अडकलेल्या सहा तरुणींची सुटका केली आहे.

रवीश शेट्टी असं अटक केलेल्या 35 वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो मूळचा कर्नाटकातील उडपी येथील रहिवासी आहे. आरोपी शेट्टी हा खडकी-दौंड येथील सुर्या लॉजवर सहा तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता. गेल्या बऱ्याच दिवसांपासून याठिकाणी हा वेश्याव्यवसाय सुरू होता. अत्यंत गुप्तता पाळून हा व्यवसाय सुरू होता. .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post