चक्क मंगल कार्यालयात बनावट दारूचा कारखाना...दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात

चक्क मंगल कार्यालयात बनावट दारूचा कारखाना...दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात नाशिकः नाशिक जिल्ह्यातल्या सायखेडा परिसरात सुरू असलेला बनावट दारूचा कारखाना पोलिसांनी उद्धवस्त केला आहे. निफाड तालुक्यातील चांदोरी येथे चक्क मंगल कार्यालयात बनावट दारूचा कारखाना असल्याचे उघड झाले होते. नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील निफाड तालुक्यातील चांदोरी येथील अंबादास विठोबा खरात यांच्या मालकीचे उदयनराजे लॉन्स आहे. यावर अवैध देशी दारू तयार होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने 11 ऑक्टोबर रोजी सोमवारी रात्री उशिरा छापा टाकला.

 यावेळी संजय मल्हारी दाते    हा तिथे सापडला. हा त्याचाच कारखान असून, येथून बनावट देशी दारूचे अंदाजे 1500 ते 2000 बॉक्स, अंदाजे दहा हजार ते पंधरा हजार देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, 20 हजार लिटर स्पिरिट, दोनशे लीटर चे 90 ते 100 बॅरेल, रिकामे बॉक्स अंदाजे पाच हजार ते 10 हजार, देशी दारू बनवण्याचे साहित्य 5 पाण्याच्या टाक्या, एक मालट्रक असा एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी या दातेच्या मालकीच्या सायखेड्यातील दुसऱ्या बनावट दारूच्या कारखान्यावर छापा टाकला. तिथे बनावट दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे तब्बल 50 लाखांचे रसायन सापडले.

दुसऱ्या कारवाईत संजय मल्हारी दातेसह (रा. गोंदेगाव, ता. निफाड) अंबादास खरात (रा. चांदोरी), शुभम शिंदे, सुरेश देवरे, दीपक पाटील (सर्व रा. धुळे), पंकजकुमार मंडल, मनिकांतकुमार मंडल (रा. बिहार) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही कारवाईत मिळून पोलिसांना दीड कोटीचा ऐवज सापडला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post