नगर जिल्ह्यात मतदार नोंदणीची संधी, विशेष कार्यक्रम जाहीर

 मतदार याद्याचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहिरनगर  - मा. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2022 या अ‍र्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण हा कार्यक्रम घोषित केला आहे. मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे

            प्रारुप मतदार यांद्यांची प्रसिध्‍दी दि. 1 नोव्‍हेंबर 2021 रोजी, दावे व हरकती स्विकारण्‍याचा कालावधी दि. 1 नोव्‍हेंबर 2021 ते 30 नोव्‍हेंबर 2021 रोजी, दावे व हरकती निकालात काढणे दि. 20 डिसेंबर 2021 पर्यंत आणि मतदार यादीची अंतिम प्रसिध्‍दी दि. 5 जानेवारी 2021 अशी असेल.

            दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी ज्‍यांचे 18 वर्षे पुर्ण होत असेल अशा सर्वांनी नवमतदार म्‍हणुन नोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्‍यांनी फॉर्म नं. 6 मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांचेकडेस भरुन द्यावा. अर्जासोबत शाळा सोडल्‍याचा दाखला छायांकित प्रत, आधरकार्ड प्रत, रेशनकार्ड छायांकित प्रत, दोन फोटो, घरातील एका व्‍यक्‍तीचे मतदान ओळखपत्र छायांकित प्रत जोडणे आवश्‍यक आहे.

            मतदार यादीमधील ज्‍या मतदारांचे फोटो नाहीत अशा मतदारांनी त्‍याचा फोटो मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांचेकडेस न चुकता जमा करावेत. जे मतदार मयत, स्‍थलांरीत व मतदार यादीत दुबार नांव आलेले आहेत अशा मतदारांनी नमुना नं. 7 फॉर्म भरुन द्यावेत, मयत मतदारांचे नातेवाईक यांनी फॉर्म नं. 7 भरुन त्‍यासोबत मृत्‍युचा दाखला जोडणे आवश्‍यक आहे.


            ज्‍या मतदारांचे नांव, वय, लिंग व चुकीचा फोटो मतदार यांदीत दाखल करावायाचे असल्‍यास अशा मतदारांनी नमुना नं.8 अ चा फॉर्म अ चा फॉर्म केंद्रस्‍तरीय अधिकारी यांचेकडेस न चुकता जमा करावेत.


            नवीन मतदार यांनी दि. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर वय वर्षे 18 पुर्ण झालेले आहे अशा नवमतदार यांनी नमुना नं.6 फॉर्म मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांचेकडेस न चुकता जमा करावेत असे आवाहन सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार नगर यांनी केले आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post