चर्चा तर होणारच...खा. सुजय विखे पाटील, पार्थ पवार यांचे मैत्रीचे बंध...friendship beyond boundaries

 चर्चा तर होणारच...खा. सुजय विखे पाटील, पार्थ पवार यांचे मैत्रीचे बंध...friendship beyond boundaries 

नगर (सचिन कलमदाणे): महाराष्ट्रातील पवार आणि विखे पाटील या मातब्बर घराण्यातील राजकीय वाद उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. मात्र दोन्ही कुटुंबातील तिसरी पिढी अनेकदा एकत्र येऊन वेगळा संदेशही देते. आताही खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी असाच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात विखे पाटील व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार एकत्र असल्याचे दिसून येते. दोघांनीही एकमेकांसोबत फोटो सेशन करीत गप्पा मारत विमान प्रवासही केला. या फोटोला विखे-पाटील यांनी friendship beyond boundaries असं सूचक कॅप्शनही दिलं आहे. या फोटोवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. अनेकांनी तर पार्थ पवार यांना भाजपमध्ये घ्या असा सल्लाही दिला आहे. दोनच दिवसांपूर्वी खा.विखे यांनी पार्थ पवार यांचे चुलत बंधू आ.रोहित पवार यांच्या वर स्वराज्य ध्वज कार्यक्रमावरून निशाणा साधला होता. दुसरीकडे आयकरच्या छापल्यामुळे पार्थ पवार हे सुद्धा चर्चेत आहेत. अशा वेळी खा. विखे-पाटील यांनी पवार- विखे यांच्यातील मैत्रीचे सूर आदळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post