ऐन सणासुदीच्या दिवसांत वीज भारनियमनाचे संकट, वीज कंपनीने केलं महत्त्वपूर्ण आवाहन

 

ऐन सणासुदीच्या दिवसांत वीज भारनियमनाचे संकट, वीज कंपनीने केलं महत्त्वपूर्ण आवाहनमुंबई  : कोळशाच्या संकटामुळे  महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजेच महावितरणाला वीज पुरवठा करणारे वीज केंद्रांचे एकूण 13 युनिट रविवारी बंद झाले. यामुळे राज्यात 3330 मेगावॅट वीज पुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे म्हणजे ग्राहकांना कमी वीज वापरण्याचे आवाहन केले जात आहे.

MSEDCL नं ग्राहकांना मागणी आणि पुरवठा यांचं संतुलन राखण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत वीजेचा कमी वापर करण्याचा सल्ला दिला आहे. 

सध्या, विजेची मागणी आणि पुरवठा यांच्यातील 3330 मेगावॅटचे अंतर भरण्यासाठी खुल्या बाजारातून वीज खरेदी केली जात आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post