महाराष्ट्रात कॉंग्रेसला धक्का...बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

 

महाराष्ट्रात कॉंग्रेसला धक्का...बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेशपरभणी - काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांचे बंधू विजयराव वरपूडकर यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वरपुडकर यांचे पक्षात स्वागत केले. विजयराव वरपूडकर परभणीचे माजी जिल्हाध्यक्ष होते.

या दिग्गज नेत्यांच्या भाजपमध्ये जाण्याचे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे परभणीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर आल्या असल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. कॉंग्रेस सत्तेत आल्यावर थांबलेलं आउटगोइंग आता पुन्हा सुरू झाल्याची चर्चा आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post