भाजपला हादरा.... मनपातील २२ विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल

 

भाजपला हादरा.... मनपातील २२ विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखलठाणे: उल्हासनगर महापालिकेत भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या २२ नगरसेवकांनी  राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उल्हासनगर महापालिकेच्या माजी महापौर व आमदार पप्पू कलानी यांच्या स्नुषा  पंचम ओमी कलानी यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला असून त्यांच्यासोबत २२ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील हे नुकतेच ठाणे दौऱ्यावर येऊन गेले होते, त्यानंतर लगेचच हा पक्ष प्रवेश संपन्न झाला आहे. या पक्ष प्रवेशामुळे आता उल्हासनगर महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार, असा विश्वास यावेळी ना. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. तसेच आणखी १० नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान,  पंचम ओमी कलानी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उल्हासनगर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post