उड्डाणपुलाच्या कामाला वेग, तीन पिलर जोडले....

उड्डाणपुलाच्या कामाला वेग, तीन पिलर जोडले.... नगर: नगर शहरातील स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. मार्केट यार्ड चौकात तीन पिलरवर स्लॅब टाकण्याचं काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे आता शहरात खर्या अर्थाने उड्डाणपुल दृष्टीपथात आला आहे. अतिशय अवजड व किचकट असं हे काम असून नगरकर रस्त्याने जाताना आवर्जून थांबून काम पाहत आहेत. दुसरीकडे सक्कर चौकातही पूलाच्या सुरूवातीचे पिलर उभारणी पूर्ण होत आली आहे. कामाचा वेग पाहता नियोजित वेळेपूर्वीच पुढील वर्षी २०२२ मध्ये हा बहुप्रतिक्षित उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post