शेतकऱ्यांसाठी महत्वाचे...ट्रॅक्टरसाठी १०० टक्क्यांपर्यंत तात्काळ कर्ज....

 

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे...ट्रॅक्टरसाठी १०० टक्क्यांपर्यंत तात्काळ कर्ज....'एसबीआय'ची योजनानवी दिल्ली :  स्टेट बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी ‘तत्काळ ट्रॅक्टर लोन’ (एसबीआय तत्काळ ट्रॅक्टर लोन) कर्जाची एक विशेष योजना आणलीय. या अंतर्गत SBI ट्रॅक्टर विमा आणि नोंदणी शुल्कासह ट्रॅक्टरच्या किमतीच्या 100% पर्यंत कर्ज प्रदान करते.

एसबीआय तत्काळ ट्रॅक्टर कर्ज हे कृषी मुदत कर्ज आहे. ट्रॅक्टर अॅक्सेसरीजची किंमत बँकेने दिलेल्या कर्जामध्ये समाविष्ट केली जाणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर कर्जामध्ये घेतलेली रक्कम शेतकरी 4 ते 5 वर्षांत लगेचच बँकेत भरू शकतात. बँकेने वित्तपुरवठा केलेल्या ट्रॅक्टरचा व्यापक विमा आहे.  बँकेने वित्तपुरवठा केलेले ट्रॅक्टर कर्जाची परतफेड होईपर्यंत बँकेकडे असेल, म्हणजेच ते एक प्रकारे गहाण ठेवले जाईल. तसेच मार्जिन मनी म्हणून स्वीकारलेल्या टीडीआरवर बँकेचा अधिकार असेल.


तत्काळ ट्रॅक्टर कर्जासाठी तुमच्याकडे किमान 2 एकर जमीन असावी.

सर्व शेतकरी या योजनेंतर्गत बँकेत कर्जासाठी अर्ज करू शकतात.

एसबीआयने कर्जामध्ये नमूद केलेले नातेवाईकच सह-अर्जदार बनू शकतात.

कर्जासाठी अर्ज भरा, यामध्ये कोणत्याही डीलरकडून ट्रॅक्टरचे कोटेशनदेखील टाका.

ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, पॅन, पासपोर्ट, आधार किंवा ड्रायव्हिंग लायसन्सपैकी एक असावे.

पत्त्याच्या पुराव्यासाठी मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्समधील एक असावे.

याशिवाय लागवडीयोग्य जमिनीचा पुरावा सादर करावा लागेल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post