जिल्ह्यातील बडा मंत्रीही भ्रष्टाचारात अडकला आहे... लवकरच पर्दाफाश...आ.विखे पाटील यांचा गौप्यस्फोट

जिल्ह्यातील बडा मंत्रीही भ्रष्टाचारात अडकला आहे... लवकरच पर्दाफाश...आ.विखे पाटील यांचा गौप्यस्फोट नगर: राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील  मंत्री व दलालांचे साटेलोटे दररोज समोर येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील  एक मोठा मंत्रीही भ्रष्टाचारात अडकला आहे. कुणी किती ‘महसूल’  गोळा केला हे ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी लोकांच्या लक्षात येईल, असा गौप्यस्फोट आ. राधाकृष्ण विखे पाटील  यांनी केला. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत श्रीरामपूर येथे 60 वर्षांवरील नागरिकांसाठी वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आ. राधाकृष्ण विखे पा. यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

राज्यातील महाविकास आघाडीच्या  भ्रष्टाचाराला लोक कंटाळलेले असून मंत्री व दलालांचे साटेलोटे रोज समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री त्यात अडकला आहे. त्यांचे प्रकरण ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी लोकांच्या लक्षात येईल. याबाबत चौकशी सुरू आहे. वास्तविक पाहता आपली पापे झाकण्यासाठी स्वायत्त संस्था असलेल्या ईडी, सीबीआय  सारख्या संस्थांवर दोषारोप चालू आहे. कारण या संस्था बदनाम करायच्या म्हणजे आपला भ्रष्टाचार लपविता येईल, या भ्रमात मंत्र्यांनी राहू नये. असा माझा त्यांना सल्ला असल्याचे ते म्हणाले.

मंत्री हा नवा आहे की जुना असे पत्रकारांनी विचारले असता, सध्या या प्रकरणावर सबुरीने घ्या, म्हणजे लवकरच मंत्री नवीन आहे की जुने हे कळेल. कोणी किती महसूल गोळा केला. हे आपोआप समोर येईल, असे त्यांनी सूचित केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post