'जाणत्या राजांना' अनेक वर्षे दिल्लीत असून जे प्रश्न सोडवता आले नाही ते मोदी सरकार सोडवत आहे,

 

जाणत्या राजांना अनेक वर्षे दिल्लीत असून जे प्रश्न सोडवता आले नाही ते मोदी सरकार सोडवत आहे, आ.विखे पाटील यांचा टोलालोणी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यामातून होत असलेल्या निर्णयामुळे सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळत आहे. अनेक वर्षे दिल्लीला चकरा मारून जाणत्या राजांना काही करता आले नाही त्या प्रश्नांबाबत केंद्र सरकार आता सकारात्मक निर्णय घेत असल्याचे प्रतिपादन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गळीत हंगाम शुभारंभाप्रसंगी केले.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 72 व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात आ. विखे पाटील यांनी सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात सहकार मंत्री अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करून केंद्र सरकारचे आभार मानले. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, व्हा.चेअरमन विश्वासराव कडू, प्रवरा बॅकेचे चेअरमन अशोक म्हसे, ट्रक वाहतूक सोसायटीचे चेअरमन नंदू राठी, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी निघुते, कामगार नेते ज्ञानदेव आहेर यांच्यासह सर्व संचालक, शेतकरी, सभासद, अधिकारी, कामगार उपस्थित होते

आ. विखे पाटील म्हणाले की, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांवर आयकाराची टांगती तलवार मागील 50 वर्षांहून अधिक काळ होती. जाणते राजे 25 वर्षे दिल्लीत होते. फक्त दिल्लीत या असा निरोप यायचा पण निर्णय कोणतेच झाले नाही. आज सहकारी साखर कारखान्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लागत असल्याकडे लक्ष वेधले.दोन दिवस दिल्लीत झालेल्या बैठकांतून राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे विखे म्हणाले

राज्यातील सहकारी साखर कारखानदारी संकटाचा सामना करीत वाटचाल करीत असली तरी ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या विश्वासावर या चळवळीने साध्य केलेल्या प्रयत्नांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळत असल्याचे आवर्जून सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post