फुकट लस घेता मग निधीसाठी इंधन दरवाढ होणारच... केंद्रीय मंत्र्यांचे स्फोटक वक्तव्य

 

फुकट लस घेता मग निधीसाठी इंधन दरवाढ होणारच... केंद्रीय मंत्र्यांचे स्फोटक वक्तव्य
गुवाहाटीः पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावर पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी मोठं वक्तव्य केले आहे.  करोनावरील लस मोफत देण्यात आली आहे आणि यासाठी पैसे कुठून येणार? तुम्ही मोफत लसीसाठी पैसे दिले नाहीत. यामुळे लसीसाठीचा निधी असाच गोळा केला गेला, असं पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली म्हणाले. रामेश्वर तेली यांचं हे वक्तव्य ९ ऑक्टोबरचं आहे. ते आसाममध्ये बोलले होते.

इंधनाचे दर अधिक नाहीत. त्यात कराचाही समावेश आहे. तुम्ही मोफत लस घेतलीच असेल. पण यासाठी पैसा कुठून येणार? तुम्ही पैसे दिले नाहीत, यामुळे त्यासाठी अशाच प्रकारे निधी जमा केला गेला, असं केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post