भाजपमध्ये 'लेटर बॉम्ब', नगरसेवक म्हणाले आमदारांच्या चुकीच्या कामांचा निवडणुकीत पक्षाला फटका बसणार...

भाजपमध्ये लेटर बॉम्ब, नगरसेवक म्हणाले आमदारांच्या चुकीच्या कामांचा निवडणुकीत पक्षाला फटका बसणार...  पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुद्द शरद पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे.  दुसरीकडे भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी थेट विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चुकांची यादीच दिलीय. 


‘उपरोक्त विषयान्वये मी तुषार कामठे (नगरसेवक पिं. चिं. मनपा) आपणास विनंती करू इच्छितो की, येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकवण्याचा आपल्या सर्वांचाच मानस आहे. पण गेल्या 5 वर्षांमध्ये शहरातील भाजपचे दोन आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या अनेक चुकीच्या कामांमुळे येत्या निवडणुकांमध्ये भाजपाला याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे’.

राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांकडून मी भाजपच्या आमदारांच्या मनमानी कारभाराला कंटाळून भाजप पक्ष सोडणार असल्याची चर्चा सध्या शहरात चालू आहे. पण मी भाजपच्या कोणत्याही आमदाराच्या गटातील म्हणून नव्हे तर भाजपचा एक सच्चा शिलेदार म्हणून काम करतो आहे. ज्या दोन आमदारांनी चुकीची कामे केली आहेत ते कदाचित स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पक्षाचा त्याग करू शकतात, तशी शक्यताही सध्या वर्तवली जात आहे. पण मी भाजपच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजकारण करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कायम पक्षाशी एकनिष्ठ राहणार असून पक्षाचे होणारे नुकसान पाहू शकत नाही. हे दोन्ही आमदार वेळ प्रसंगी पक्ष बदलतील परंतु नवीन कार्यकर्ता केव्हा ही पक्ष बदलू शकत नाही. तरी माझ्या विनंतीचा सकारात्मक विचार करून आपण निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती’.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post